उन्हाळ्यात केसांची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचं कारण म्हणजे सतत येणारा घाम.
प्रत्येक ऋतू नुसार उन्हाळ्यात केसांची वेगळ्या पद्धतीनं काळजी घ्यावी लागते.
सगळ्यांच्या डोक्यात एकच प्रश्न असतो की उन्हाळ्यात आठवड्यातून किती वेळा केस धुवायचे.
हेयर एक्सपर्टनुसार तुम्ही उन्हाळ्यात केसांची जास्त काळजी घ्यायला हवी.
तुमचे केस ड्राय असतील तर आठवड्यातून दोन ते तीन वेळा केस धुवायला हवे.
तेल न लावताही तुमचे केस तेलकट राहत असतील तर आठवड्यातून पाच वेळा केस धुवा असं त्याचं म्हणणं आहे.
जर तुमचे केस फ्रिजी असतील तर आठवड्यातून दोन वेळा धुवायला हवे. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)