भारत - पाकिस्तान यांच्यात युद्धजन्यस्थिती कायम आहे. 10 मे रोजी दोन्ही देशांनी शस्त्रसंधीची घोषणा केली मात्र अवघ्या काही तासातच पाकिस्तानने भारतावर ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न करून शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं.
भारत - पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीत पाकिस्तानकडून अनेकदा अणुबॉम्ब हल्ला करण्याची धमकी देण्यात आली. दोन्ही देशांकडे अण्वस्त्र आहेत. त्यामुळे अशा हल्ल्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
अणुबॉम्ब हे प्रचंड विनाशकारी असतात त्यामुळे तेव्हा अणुबॉम्ब हल्ला झाल्यास स्वतःला कसं वाचवावं याविषयी जाणून घ्या.
अणुबॉम्ब हल्ला झाल्यास त्वरित सुरक्षित आश्रयस्थान शोधा. हल्ल्यानंतर पळण्याचा प्रयत्न न करता मजबूत इमारत किंवा घरात प्रवेश करा आणि स्वतःला बंदिस्त करून घ्या.
अणुबॉम्ब हल्ला झाल्यास कमीत कमी 24 तास घराबाहेर पडू नका. अणुबॉम्ब हल्ल्याचे रेडिएशन हळूहळू कमी होतात त्यामुळे हल्ला झाल्यानंतर सुरुवातीचे काही तास अत्यंत महत्वाचे ठरतात.
अणुबॉम्ब हल्ला झाल्यास कपड्यांवर रेडिएशनचे कण असू शकतात. ते इतरांच्या संपर्कात येणार नाहीत याची काळजी घ्या, तसेच कपडे बदला.
असा हल्ला झाल्यास पाण्याने आंघोळ करून शरीर स्वच्छ करून घ्या. डोळे, नाक, कान स्वच्छ कपड्याने पुसा. सरकारी आणि अधिकृत सूचनांचे पालन करा.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)