सुकलेलं लिंबू फेकून देत असाल तर आताच थांबा! जाणून घ्या त्याचे उपयुक्त फायदे

Intern
Apr 17,2025


उन्हाळ्यात लोक पोटाला थंडावा मिळावा म्हणून लिंबू सरबत पितात.


लिंबामध्ये 'व्हिटॅमिन C' भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे लिंबू त्वचेसाठी खूपच फायदेशीर ठरतो.


पण लिंबं खूप दिवस घरात पडून राहिले की सुकतात, काळपट होतात आणि आपण ती फेकून देतो. मात्र, हीच सुकलेली लिंबं तुम्ही वेगवेगळ्या उपयुक्त पद्धतीने वापरू शकता.

रसासाठी वापर

सुकलेली लिंब गरम पाण्यात काही वेळ भिजवून ठेवावे. यामुळे लिंबू मऊ होतात आणि त्यातून पुन्हा रस काढता येतो.

फेस वॉश

लिंबू पूर्णपणे मऊ पडल्यास त्याचा गर चेहऱ्यावर लावून नैसर्गिक फेस वॉश म्हणून वापर करू शकता. विशेष म्हणजे ज्यांची त्वचा तेलकट आहे. त्यांच्यासाठी हा उपाय खूप फायदेशीर आहे.

त्वचेवरील तेल

लिंबू थेट हातात घेऊन चेहऱ्यावर फिरवा. यामुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल निघून जाईल आणि त्वचा तजेलदार बनेल.

हर्बल टीसाठी वापर

कोरडे लिंबू पाण्यात उकळून त्याचा उपयोग हर्बल टीसाठी करता येतो. हा चहा वजन कमी करण्याच्या प्रवासात उपयुक्त ठरतो.

स्वच्छतेसाठी घरगुती क्लीनर

लिंबं पाण्यात भिजवून त्यात थोडा सोडा आणि एक चमचा डिशवॉश लिक्विड मिसळा. हे मिश्रण स्प्रे बाटलीत भरून घरातील स्वच्छतेसाठी वापरता येतो.

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story