ट्रेनमधून चुकूनही नेऊ नका 'हे' फळ, अन्यथा येईल तुरंगात जायची वेळ

Pooja Pawar
Jul 01,2025


भारतातील रेल्वे मार्गाचं जाळं खूप मोठं आहे. अशातच दिवसातून हजारो प्रवासी या रेल्वेतून प्रवास करतात.


रेल्वे प्रवासादरम्यान प्रवासी आपल्या सोबत महत्वाचं आणि आवश्यक सामान सुद्धा सोबत घेऊन जातात.


भारतीय रेल्वेने प्रवासांच्या सोयी आणि सुरक्षेसाठी काही नियम बनवले आहेत. तेव्हा एका अशा नियमांबद्दल जाणून घेऊयात ज्याबद्दल कदाचित अनेक प्रवासी अनभिद्न्य असतील.


ट्रेनमध्ये नारळ हे फळ घेऊन जाण्यास मनाई आहे.


याचं कारण म्हणजे वाळलेल्या नारळाच्या बाहेर असणारी साल आगीचा धोका निर्माण करते. या कारणामुळे, तो ट्रेनमध्ये घेऊन जाण्यास मनाई केली जाते.


रेल्वे नियमांनुसार जर कोणत्याही व्यक्तीने प्रतिबंधित वस्तू घेऊन रेल्वे प्रवास केल्यास त्यास 1 हजार रुपये किंवा 3 वर्षांचा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

VIEW ALL

Read Next Story