'या' 5 देशात वीजा शिवाय फिरू शकतात भारतीय

Pooja Pawar
Mar 05,2025


कोणत्याही देशात फिरण्याकरता जाण्यासाठी सर्वात आधी त्या देशाचा वीजा काढावा लागतो. बऱ्याचदा वीजा काढण्यासाठी प्रक्रिया खूप किचकट असते.


पण तुम्हाला माहितीये का की काही देश असेही आहेत जिथे जाण्यासाठी भारतीयांना वीजा लागत नाही.

मालदीव :

मालदीव हा देश तेथील सुंदर समुद्र किनाऱ्यांसाठी प्रसिद्ध असून भारतीय तेथे 90 दिवस वीजा शिवाय राहू शकतात.

नेपाळ :

नेपाळ हा देश भारताच्या शेजारीच असून तेथे अनेक हिंदू मंदिर आणि सुंदर डोंगररांगा आहेत. येथे जाण्यासाठी भारतीयांना वीजा लागत नाही.

मॉरिशियस :

मॉरिशियस देशात भारतीय पर्यटक 90 दिवस वीजा शिवाय राहू शकतात आणि तेथील पर्यटनस्थळ पाहण्याचा आनंद घेऊ शकतात.

भूतान :

हिमाचलच्या डोंगराळ भागात असलेला हा देश तेथील निसर्ग सौंदर्य आणि संस्कृतीसाठी खूप प्रसिद्ध आहे.

सेशेल्स :

सेशेल्स हे बेट आपले सुंदर समुद्र किनारे आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे भारतीय केवळ 30 दिवस वीजा शिवाय राहू शकतात.

VIEW ALL

Read Next Story