सफरचंद तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. हे फळ अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करते.
पण अनेकदा लोक सफरचंदाची सालं कचरा समजून फेकून देतात.
तर जाणून घेऊयात सफरचंदाच्या सालींचा उपयोग कसा करता येतो.
सफरचंदाच्या सालांपासून तुम्ही चविष्ट आणि कुरकुरीत अॅपल चिप्स बनवू शकता. चिप्स तयार करायला सोपे असतात आणि स्नॅक्ससाठी उत्तम पर्याय ठरतात.
स्वयंपाकघर सुगंधित ठेवण्यासाठी सफरचंदाच्या सालींपासून नैसर्गिक एअर फ्रेशनर तयार करू शकता.
सफरचंदाच्या सालांपासून घरगुती फेसपॅक तयार करता येतो. यामुळे चेहरा टवटवीत आणि उजळ दिसतो.
या सालांचा वापर जैविक खत (कंपोस्ट) तयार करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. यामुळे झाडांना पोषण मिळते आणि त्यांची वाढ अधिक चांगली होते.