जंगलापासून ते अगदी घरातील भिंतींपर्यंत पाली जवळपास सगळीकडेच आढळून येतात.
जगभरामध्ये पालींच्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत. या प्रत्येक प्रजातीचं आपआपलं खास वैशिष्ट्यं आहे.
काही पाली या शरीराचा रंग बदलण्यासाठी ओळखल्या जातात तर त्यांच्यामधील विषाच्या क्षमतेमुळे!
घरात आढळून येणारी पाल ही House Gecko नावाने ओळखली जाते. ही पाल अगदीच साध्या रंगाची असते.
घरात आढळणाऱ्या पालीला अनेक लोक घाबरतात. ही पाल चावली किंवा ती जेवणात पडली तर लगेच विष सोडते असं मानलं जातं.
पण घरातील पाली खरंच विषारी असतात का? याचं उत्तर जाणून घेऊयात...
घरात आढळणाऱ्या पालीने चावा घेणं फारच दुर्मिळ आहे. या पाली घाबरुन पळून जातात. या पाली मनुष्यावर हल्ला करत नाहीत.
या पाली विषारी नसल्यातरी त्यांच्यापासून आरोग्याला धोका पोहचू शकतो.
घरात सापडणाऱ्या पाली विषारी नसल्या तरी त्यांच्या माध्यमातून विषाणू आणि आजारांचा प्रादुर्भाव होऊ शकतो.
पालीच्या शरीरावर विषाणू असतात ज्यामुळे खाण्या-पिण्याच्या गोष्टी दूषित होऊ शकतात.
चुकून पाल पडलेले अन्नपदार्थ खाल्ले तर त्यामधून विषबाधा होण्याची शक्यता टाळता येत नाही. मात्र ही विषबाधा पालीच्या शरीरावरील विषाणूंमुळे होते.
घरात एखादी पाल तुम्हाला चावली तर तातडीने जखम पाणी आणि साबणाने धुवून घ्यावं. त्यानंतर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)