International Coffee Day 2024: तुम्हाला कॉफीचे 'हे' प्रकार माहित आहेत का?

आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस

आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस हा दरवर्षी १ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस कॉफीची लोकप्रियता साजरी करण्यासाठी असतो.

फ्लॅट व्हाइट

फ्लॅट व्हाइट हा प्रकार एस्प्रेसोवर आधारित आहे. यामध्ये दूध जास्त असते. छान स्मूद आणि मलईदार असे याच टेक्शर असते.

एस्प्रेसो

एस्प्रेसो ही कॉफी बीन्समध्ये बारीक करून गरम पाणी घालून बनवलेली स्ट्रॉंग कॉफी आहे. कॉफीचा हा प्रकार सामान्यतः ब्लॅक कॉफी म्हणूनही ओळखला जातो.

कोल्ड ब्रू

गरम वातावरणात कोल्ड ब्रू वेगळंच सुख देते. हे तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कोल्ड ब्रूइंग प्रक्रियेमुळे, या पेयाला गोड चव असते. बाकीच्या प्रकरणपेक्षा ही अधिक चवदार कॉफी आहे.

कॅपेचिनो

एस्प्रेसो, दूध आणि दुधाचा फेस समान प्रमाणात मिसळून कॅपेचिनो ही एक लोकप्रिय इटालियन कॉफी बनवली जाते. यावर कोको किंवा दालचिनी पावडरही वरती शिंपडले जातात.

कॅफे लाटे

कॅफे लाटे हे एस्प्रेसो आणि वाफवलेल्या दुधाच्या मिश्रणाने बनवलेली कॉफी असते. यामध्ये एक थोड्या प्रमाणात दुधाचा फेस वरती असतो.

एफोगाटो

ही कॉफी एखाद्या डेझर्टप्रमाणेच असते. हॉट एस्प्रेसो कॉफीमध्ये व्हॅनिला आइस्क्रीम घालून दिले जाते. ही एक ही इटालियन डिश आहे.


हे सहा प्रकार सोडून जगभरात अजूनही कॉफीचे अनेक प्रकार आहेत. (All Photos Credit: Freepik)

VIEW ALL

Read Next Story