मे महिना आला की उन्हाची तमा न बाळगता आंब्यावर ताव मारणे अनेकजण तुम्ही पाहिले असतील.
हा आंबा खाण्याचा काही वेळकाळ नसतो, असे कितीही मीम्स व्हायरल झाले तरीही रात्री झोपण्यापूर्वी आंबा खाणं टाळण्याचा सल्ला सहसा दिला जातो.
रात्री किंबहुना झोपण्यापूर्वी आंबा खाल्ल्यास पचनाच्या समस्या उदभवू शकतात. यामागेही काही कारणं आहेत.
रात्रीच्या वेळी पचनक्रियेचा वेग मंदावतो. त्यामुळं गोड, उष्ण आणि पचण्यास जड अन्नपदार्थ टाळण्याचा सल्ला दिला जातो.
आंब्यामध्ये असणारी साखर रक्तातील साखरेत मिळून शरीराला उर्जा देते आणि त्यामुळे झोपेचं चक्रसुद्धा बिघडतं.
परिणामी आंबाच नव्हे, तर कोणतंही फळ सकाळी पाणी प्यायल्यानंतर खाल्ल्यास शरीराला त्याचा फायदाच होतो. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे जेवल्यानंतर आंबा किंवा कोणतंही फळ न खाण्याचा सल्ला दिला जातो. अशानं आम्लपित्त अर्थात Acidity वाढू शकते.
लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे जेवल्यानंतर आंबा किंवा कोणतंही फळ न खाण्याचा सल्ला दिला जातो. अशानं आम्लपित्त अर्थात Acidity वाढू शकते. जेवणानंतर एक किवा दोन तासांच्या कालावधीनंतर फळं खाण्याचा सल्ला दिला जातो. (वरील माहिती सामान्य संदर्भांच्या आधारे घेण्यात आली असून झी 24 तास याची खातरजमा करत नाही. आहारविषयक सल्ल्यांसाठी तज्ज्ञांचं मार्गदर्शन अवश्य घ्या.)