AC सोबत पंखा चालवणे योग्य की अयोग्य?

Neha Choudhary
May 01,2025


मे महिन्याची सुरुवात झाली आहे. उष्णतेने कहर केला आहे.


अशात अनेक घरांमध्ये एसीसोबत पंखे लावून गारव्याची मजा घेतली जात आहे.


पण एसीसोबत पंखा लावणे हे योग्य आहे की नाही ते पाहूयात.


खरंतर एसीसोबत पंखा लावल्यास थंड हवा खोलीत लवकर पसरण्यास मदत मिळते. त्यामुळे खोली लगेचच थंड होते.


एसीमुळे एका विशिष्ट जागेवर थंड हवा पोहोतचे. पंख्यामुळे खोलीच्या प्रत्येक कोपरा गार होण्यास मदत मिळते.


एसीचे तापमान थोडे वाढवून आणि पंखा लावल्यास खोली लगेचच गार होते. याचा फायदा म्हणजे तुमचं विजेचं बली कमी होतं.


सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंखा खोलीत हवेचा प्रवाह राखतो, ज्यामुळे गुदमरल्यासारखं वाटत नाही आणि ताजेपणा राहतो.


खोली लवकर थंड झाल्यामुळे एसीला सतत काम करावं लागत नाही. त्यामुळे मशीनवरील दाब कमी होतो.


एसीसोबत पंखा चालवणे हे पूर्णपणे वैयक्तिक गरज आणि आरामवर अवलंबून असतं.

VIEW ALL

Read Next Story