सामुद्रिक शास्त्रानुसार व्यक्तीच्या शरीराची ठेवणं आणि त्यांच्या शरीरावरील केसं आणि तीळ हे बऱ्याच गोष्टींबाबत सांगतात.
सामुद्रिक शास्त्रनुसार व्यक्तीच्या हात, पाय, तीळ आणि अवयवांवर असणारे केस हे शुभ आणि अशुभ संकेत देतात.
तेव्हा जाणून घेऊयात की महिलांच्या पायाच्या अंगठयावर केसं असणं हे शुभ असतं कि अशुभ?
सामुद्रिक शास्त्रनुसार महिलांच्या पायाच्या अंगठ्यावर केसं असणं हे फार चांगलं मानलं जातं.
शास्त्रानुसार ज्या महिलांच्या पायाच्या अंगठ्यावर केस असतात त्यांना नशिबाची साथ लाभते.
पायाच्या अंगठ्यावर केस असणाऱ्या महिलांचं व्यक्तिमत्व हे फार प्रभावशाली असतं. त्या स्वतःची वेगळी ओळख बनवतात.
अशा महिलांना जीवनात कधीही पैशांची कमतरता नसते आणि थोडी मेहनत करताच यश सुद्धा मिळतं.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती सामुद्रिक शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)