पैशांच्या पाकिटात ठेवा 'या' झाडाचं पान, लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहील

Pooja Pawar
May 17,2025


ज्योतिषशास्त्र आणि वास्तूशास्त्र इत्यादींमध्ये तुळस आणि त्याचा पानांबाबत महत्वाचे नियम सांगितले आहेत.


धार्मिक मान्यतेनुसार तुळस ही भगवान विष्णूंना प्रिय आहे कारण यात लक्ष्मी देवीचा वास असतो. असं म्हणतात ज्या घरात दररोज तुळशीची पूजा केली जाते तिथे दारिद्र प्रवेश करत नाही.


तुळशीचं एक पान पैशांच्या पाकिटात ठेवणं शुभ मानलं जातं, यामुळे अनेक लाभ मिळतात अशी मान्यता आहे.


सकाळी आंघोळ केल्यावर तुळशीची पूजा करावी आणि मग त्याच एक पान तोडून त्याला लाल कपड्यात गुंडाळून पाकिटात ठेवावं.


पण लक्षात ठेवा तुम्ही तोडत असलेलं तुळशीचं पण हे ताज असायला हवं. तसेच रविवारी किंवा एकादशीच्या दिवशी हे पान तोडू नये. तसेच हा उपाय तुम्ही करत आहात याबाबत कोणाला सांगू नका.


तुळशीचं पान पाकिटामध्ये ठेवल्याने कर्जापासून लवकर मुक्ती मिळते आणि आर्थिक स्थिती सुधारते.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती वास्तूशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

VIEW ALL

Read Next Story