अनेकदा थकवा, सूज आणि वारंवार होणारी लघवी इत्यादींना अनेकदा तुम्ही लहान मोठ्या समस्या समजून दुर्लक्ष करता. पण कदाचित हेच संकेत तुमची किडनी खराब होण्याची लक्षण असू शकतात.
जेव्हा किडनी योग्यपणे फिल्टर करू शकत नाही तेव्हा शरीरात जास्त द्रव जमा होऊ शकतो. यामुळे पाय, घोटे, हात आणि चेहऱ्यावर सूज येते. जर सकाळ सकाळी जास्त सूज असेल तर हा किडनीचा आजार असल्याचे लक्षण असू शकते.
लघवीच्या रंगात आणि प्रमाणात बदल : किडनीच्या समस्येमुळे सुरुवातीला लघवीचा रंग बदलणं हे त्याचं एक संकेत असू शकतं. खूप गडद, खूप हलके, फेसयुक्त किंवा रक्तात मिसळलेले मूत्र किडनी फेल झाल्याचे दर्शवू शकते.
जेव्हा किडनी योग्य प्रकारे कार्य करत नाही तेव्हा शरीरात विषारी पदार्थ आणि अशुद्धता जमा होते. ज्यामुळे थकवा, अशक्तपणा येतो आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचणी येतात.
किडनी फेल झाल्याने शरीरातील टाकाऊ पदार्थांचे प्रमाण वाढते, ज्यामुळे भूक न लागणे, तोंडात कडूपणा आणि वारंवार उलट्या किंवा मळमळ होणे अशी लक्षण जाणवतात.
किडनी फेल झाल्याने द्रव फुफ्फुसांमध्ये जमा होऊ शकतं, ज्यामुळे श्वास घेण्यात त्रास होऊन छातीत जडपण येऊ शकतो. तसेच, अशक्तपणामुळे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे देखील श्वास घेण्यास त्रास होतो.
किडनी ही रक्तातील कचरा आणि अतिरिक्त मिनरल्स काढून टाकण्याचे काम करतात. जेव्हा ही प्रक्रिया बिघडते तेव्हा शरीरात टॉक्सिन जमा होतात आणि शरीराला खाज येणे सारख्या समस्या होतात.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)