Breakfast Recipe: उरलेल्या ब्रेडपासून तयार करा झटपट ब्रेड पोहे; 10 मिनिटांत बनवा चविष्ट नाश्ता!

Intern
May 28,2025


पावसाळ्यात संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी चटपटीत आणि वेगळं खावंसं वाटतं का?


रोज नाश्त्याला ब्रेडपासून तेच-तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल, तर आज काही वेगळं ट्राय करा.


फक्त 10 मिनिटांत तयार होणारे ब्रेड पोहे हा एक झटपट आणि चविष्ट पर्याय आहे. जाणून घेऊयात ही सोपी आणि झटपट बनणारी रेसिपी.

साहित्य

ब्रेड स्लाइस, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो , हिरवी मिरची, कढी पत्ता, जिरे , मोहरी, हळद , मीठ, लिंबाचा रस, तेल आणि कोथिंबीर

कृती

सर्वप्रथम ब्रेडचे लहान तुकडे करून एका बाजूला ठेवा.


कढईत थोडं तेल गरम करा आणि त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाका.


त्यात चिरलेला कांदा घालून तो सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्या.


आता त्यात हळद आणि टोमॅटो घालून 2-3 मिनिटे शिजू द्या. नंतर त्यात ब्रेडचे तुकडे घालून चांगले मिक्स करा.


चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस घालून नीट हलवा. शेवटी, चिरलेली कोथिंबीर घालून सजवा आणि गरमागरम सर्व्ह करा.


या पोह्यांमध्ये हवे असल्यास उकडलेला बटाटा, उकडलेले मटार किंवा चाट मसाला देखील घालू शकता, यामुळे चव आणखीनच वाढेल.


हा झटपट नाश्ता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा ठरेल.

VIEW ALL

Read Next Story