भांड्यावर साचलेला काळा थर स्वच्छ करण्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागते. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.
कढाईवरील चिकट थर स्वच्छ करण्यासाठी तुम्ही किचनमधीलच दोन वस्तू वापरून लख्ख स्वच्छ करू शकता.
लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा वापरून तुम्ही कढाईवरील काळा थर स्वच्छ करु शकता
कढाईत पाणी भरून गॅसवर तापत ठेवा. या पाण्यात 1-2 चमचे लिंबाचा रस आणि 1 चमचा बेकिंग सोडा टाका
आता हे पाणी चांगले उकळू द्या. त्यानंतर गॅस बंद करा
आता हे पाणी ओतून द्या आणि स्क्रबर व साबणाने कढाई चांगली घासून घ्या.