आजकाल घरात नॉनस्टिक भांडी वापरली जातात. मात्र सतत वापरून वापरून भांड्यावर काळा थर साचतो
आज आम्ही तुम्हाला नॉनस्टिकची करपलेली भांडी कशी स्वच्छ करायची हे सांगणार आहोत
पाणी गरम करुन त्यात मीठ टाका आणि विरघळू द्या. आता त्या पाण्यात बेकिंग सोडा आणि व्हिनेगर टाकून चांगले मिक्स करुन घ्या
आता हे मिश्रण तव्यावर टाकून पाच मिनिटे ठेवा. नंतर स्पंजच्या मदतीने स्वच्छ करुन घ्या
तव्यावरील काळा थर आणि चिकट डाग निघून जातील
आणि तवा नव्यासारखा चमकेल