चिकाच्या दुधाशिवाय घरच्या घरी बनवा जाळीदार खरवस; फक्त ही 1 टिप वापरा

खरवस हा सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ आहे. पण खरवस बनवण्यासाठी चिकदूधच वापरावे लागते. चिकदुधाचा खरवस खूपच स्वादिष्ट लागतो.

मात्र, शहरात चिकदुध मिळणे फार कठिण असते. पण चिकाच्या दूधाशिवायही मऊ जाळीदार खरवस तुम्ही बनवू शकता. कसा ते पाहूया.

साहित्य

1 कप दूध, मिल्क पावडर - 1 कप, दही, कंडेन्स मिल्क-1 कप, वेलची पूड 1 टेबलप्सून, अॅल्युमिनियम फॉइल- 1 तुकडा, पाणी

कृती

एका मोठ्या पातेल्यात दूध ओतून घ्यावे या दुधात आता एक कप मिल्क पावडर घालावी. मिल्कपावडर पूर्णपणे दुधात विरघळेल याची काळजी घ्या.

दूध आणि मिल्क पावडर पूर्णपणे एकजीव झाल्यानंतर त्यात दही टाकावे आणि पुन्हा एकदा दही नीट एकजीव करुन घ्या.

त्यानंतर या मिश्रणात कंडेन्स मिल्क घालून ते एकजीव होईपर्यंत ढवळून घ्या. त्यावर वेलची पूड टाका. आता अॅल्युमिनियम फॉइलने हे मिश्रण झाकून घ्या.

आता एका पॅनमध्ये पाणी टाकून त्यावर स्टँड ठेवा. नंतर स्टँडवर तयार झालेले मिश्रण ठेवून ३० ते 40 मिनिटे वाफवून घ्या. खरवस तयार

VIEW ALL

Read Next Story