ऑफिसला जाणाऱ्या महिला सकाळ-संध्याकाळसाठी एकदाच चपात्या बनवून ठेवतात.
मात्र, सकाळी केलेल्या चपात्या रात्रीपर्यंत कडक होऊन जातात. त्यामुळं त्या खाव्याशा वाटत नाहीत.
चपात्या मऊ व फुलाव्यात असं वाटत असेल तर कणिक भिजवताना ही एक वस्तु वापरा.
चपात्या मऊ होण्यासाठी कणिक मळताना कोमट पाण्याचा वापर करा
कोमट पाण्याने पीठ मळल्यास ते लगेचच कडक होत नाही.
चपात्या लाटायला घेण्यापूर्वी 15 मिनिटे कणिक झाकून ठेवा.
त्यानंतर कणकेचे गोळे करुन चपाती मळण्याआधी एकदा पुन्हा मळून घ्या
या पद्धतीने चपात्या केल्यास दीर्घकाळापर्यंत मऊ राहतील.