कांदा आणि बटाट्याचा वापर जवळपास सर्व खाद्यपदार्थांमध्ये केला जातो.
अनेकदा हेच कांदे बटाटे स्वयंपाकघरात एकाच ठिकाणी, टोपलीत किंवा तत्सम खणात ठेवले जातात.
पण, असं करणं कितपत योग्य? तुम्हाला कल्पना आहे? लक्षात घ्या, बटाट्यामध्ये मोठ्या प्रमाणात सेलेनिन आणि एलिन सल्फाईड असतात.
कांद्यामध्ये सल्फरचं प्रमाण अधिक असतं. ज्यामुळं कांदा आणि बटाटा एकत्र ठेवल्यास त्यांना मोड येण्यास सुरुवात होते.
बटाट्यांना मोड आल्यानं चाकोनीन आणि क्लोरोफिल बनण्यास सुरुवात होते.
वरील सर्व रसायनांमुळं शरीरात नकारात्मक घटकांमध्ये वाढ होऊन ते जीवघेणेही ठरु शकतात.
लहान मुलांवर याचा सर्वाधिक परिणाम दिसून येतो. (वरील माहिती उपलब्ध संदर्भांवरुन घेण्यात आली असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)