पुरी, चपाती, किंवा मग पराठा... हे किंवा तत्सम पदार्थ बनवताना कायमच स्वयंपाकघरात प्रचंड धूर होत जातो आणि अनेकदा हा धूर त्रासदायक ठरतो.
काही सोप्या युक्ती वापरून तुम्ही या धुरापासून मुक्त होऊ शकता. यासाठी ओल्या कापडाचा वापर तुम्ही करु शकता. ओलं कापड स्वयंपाकघराच्या दारावर लावलं असता धूर बाहेर जात नाही.
अनेक घरांमध्ये हे पुरी किंवा चपाती बनवण्यासाठी अॅल्युमिनियमच्या कढईचा वापर केला जातो. ही भांडी तुलनेनं लवकर गरम होतात आणि त्यामुळंही धूर वाढतो.
वरील पदार्थ तयार करताना सहसा लोखंडाच्या भांड्यांचा वापर करणं फायद्याचं ठरेल.
धूर प्रचंड प्रमाणात वाढत असल्यास आणखी एक करण्याजोगा उपाय म्हणजे तेलाचं तापमान संतुलित ठेवणं.
गॅसची आच एकसारखी ठेवत तेलात थोडं मीठ टाकल्यास कायम मध्यम आचेवर पुरी, पराठा आणि पोळी बनवल्य़ास धुराचा फारसा त्रास होत नाही.
एका ग्लासात व्हिनेगर घेऊन ते गॅसपाशी ठेवल्यास तो धूर शोषण्याचं काम करतो आणि या त्रासापासून मुक्तता मिळते. (वरील माहिती सामान्य संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)