उन्हाळा हा आंब्यांचा सीजन आहे. कच्च्या आंब्यांपासून अनेकजण आंब्याचं लोणचं बनवतात.
अशावेळी आंब्याचं लोणचं वर्षभर टिकेल यासाठी त्याला साठवून ठेवताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी.
चिनी मातीच्या भांड्यात लोणचं ठेवणं चांगलं असतं.
काचेच्या भांड्यात सुद्धा तुम्ही लोणचं ठेवू शकता. काचेच्या भांड्यात लोणचं ठेवल्याने ते रिऍक्ट करत नाही.
मातीच्या भांड्यात सुद्धा तुम्ही लोणचं साठवून ठेवू शकता, मात्र ते भांड जुनं असायला हवं.
स्टील तसेच प्लास्टिकच्या डब्यात लोणचं साठवून ठेऊ नका. कारण लोणचं हे ऍसिडिक असतं आणि प्लास्टिकच्या डब्यात ठेवल्याने त्याला फंगस येऊ शकते.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)