हवामान बदलाचा परिणाम पदार्थांवरही होतो. त्यामुळं ते लवकर खराब व्हायला सुरुवात होते
दही दीर्घकाळापर्यंत फ्रेश ठेवण्यासाठी विरजण योग्य वेळी लावणं गरजेचं आहे
दह्याचं विरजण नेहमी रात्री लावावं जेणेकरुन सकाळी घट्ट दही मिळेल.
दही ताजं ठेवण्यासाठी ते मातीच्या भांड्यात ठेवा. कारण यात दही घट्ट राहते व पाणीही सुटत नाही
दही नेहमी थंड वातावरणातच स्टोअर केले पाहिजे ज्यामुळं ते लवकर खराब होणार नाही
दह्याचे विरजण ज्या भांड्यात लावणार आहात ते भांड स्वच्छ करुन घ्या.