साखर न घालता गोडाचा शिरा कसा बनवायचा, हे आज आपण जाणून घेऊया.
वाटी रवा, 4 वाट्या पाणी, गुळाची पावडर, सुका मेवा, वेलची पावडर, तूप
सगळ्यात आधी एका कढाईत तूप घाला. तूप गरम झाल्यावर त्यात रवा भाजून घ्या. रवा हलकासा लाल होऊ द्या.
आता एका भांड्यात चार वाट्या पाणी घ्या. पाणी थोडं गरम झाल्यानंतर त्यात एक वाटी गुळ टाका आणि पाणी विरघळू द्या. गुळाची पावडर चांगली विरघळू द्या.
हे गुळाचे पाणी भाजलेल्या रव्यात घाला. त्यानंतर चांगले एकजीव करुन घ्या.
आता या मिश्रणात सर्व सुकामेवा, वेलची पावडर घालून सर्व मिश्रण एकजीव करुन घ्या.
त्यानंतर कढईवर झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटे एक शिरा वाफवून घ्या. नंतर गॅस बंद करुन शिरा खायला घ्या.