अशावेळी गव्हाच्या पिठापासून बनवा हा पौष्टिक नाश्ता. सकाळी घाई गडबडीत असताना नाश्ताला काय बनवायचे असा प्रश्न पडतो.
गव्हाचं पीठ, जिरे, ओवा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, ओलं खोबरं, हळद, मीठ, पाणी, कोथिंबीर, तेल
एका भांड्यात गव्हाच पीठ, जिरे, ओवा, बारीक चिरलेली मिरची, ओलं खोबरं, हळद टाका
आता या मिश्रणात पाणी टाकून एकजीव करुन घ्या. डोश्या प्रमाणे बॅटर करुन घ्या
आता एक पॅन घेऊन तो चांगला गरम झाल्यावर या पीठाचे डोशे काढून घ्या
चांगले खरपूस भाजून झाल्यावर चटणी किंवा लोणच्यासोबत तुम्ही खाऊ शकता