'या' 5 चुकांमुळे BLOCK होऊ शकतं तुमचं बँक Account; जाणून घ्या कारणं

Published by: Swapnil Ghangale | Jul 03, 2025

बँकेच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार

आपल्यापैकी प्रत्येकाचं एखाद्या ना एखाद्या बँकेत तरी खातं असतं. याच खात्याच्या माध्यमातून आपण आर्थिक व्यवहार करत असतो.

Published by: Swapnil Ghangale | Jul 03, 2025

काही व्यवहारांना बंदी

मात्र बँकांमध्ये काही आर्थिक व्यवहारांना बंदी असते. असे व्यवहार तुमच्या खात्यावर कळत, नकळतपणे झाले तर तुमचं खातं बँक गोठवू शकते.

Published by: Swapnil Ghangale | Jul 03, 2025

खातं गोठवण्याचा अधिकार बँकांकडे

तुमच्या खात्याशी संलग्न व्यवहार थांबवण्याचा तसेच तुमचं खातं गोठवण्याचा अधिकार बँकांकडे असतो.

Published by: Swapnil Ghangale | Jul 03, 2025

व्यवहार थांबवण्याचे अधिकार

तुमच्या खात्यावरुन फसवणूक होत असल्याची शंका बँकेला आली तर त्या खात्यावरुन होणारे व्यवहार थांबवण्याचे अधिकार बँकेला असतात.

Published by: Swapnil Ghangale | Jul 03, 2025

काळा पैसा

तुमच्या बँक खात्यावरुन काळापैसा किंवा बेनामी पैसा वळवण्यात आला आहे किंवा तसे व्यवहार झाल्याची शंका आल्यास बँक खातं गोठवू शकते.

Published by: Swapnil Ghangale | Jul 03, 2025

किमान बॅलेन्स

किमान बॅलेन्स अथवा नियमितपणे खातं हातळलं जात नसेल तर बँक ते खातं गोठवू शकते.

Published by: Swapnil Ghangale | Jul 03, 2025

कोर्टाच्या आधेशानुसार

कोर्टाने एखाद्या कायदेशीर प्रकरणामध्ये तुमच्या खात्यावरील व्यवहार रोखून धरण्यास सांगितले तर तुमचं खातं बँकेकडून कोर्टाच्या आधेशानुसार गोठवलं जाऊ शकतं.

Published by: Swapnil Ghangale | Jul 03, 2025

काही काळासाठी किंवा पडताळणीपुरतं...

असामान्यपणे तुमच्या खात्यावरुन व्यवहार होत आहेत, मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जात आहे असं दिसून आलं तर बँक तुमचं खातं काही काळासाठी किंवा पडताळणीपुरतं गोठवू शकते.

Published by: Swapnil Ghangale | Jul 03, 2025

पुन्हा खातं कसं सुरु करायचं?

बँक खातं गोठवल्यास बँकेशीस संपर्क साधून त्यामागील कारण जाणून घेऊन आवश्यक ती पूर्तता केल्यास बँकेकडून खातं पुन्हा सुरु केलं जातं.

Published by: Swapnil Ghangale | Jul 03, 2025

माहिती सामान्य संदर्भांवरून

(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे.)

Published by: Swapnil Ghangale | Jul 03, 2025

VIEW ALL

Read Next Story