चैत्र नवरात्रीमध्ये देवीला अर्पण करा ही एक गोष्ट, मिळतील अनेक फायदे

Pooja Pawar
Mar 30,2025


हिंदू धर्मामध्ये चैत्र नवरात्रीला विशेष महत्व असते. यादरम्यान दुर्गा मातेची पूजा केली जाते.


पंचांगानुसार चैत्र नवरात्री 30 एप्रिल 2025 पासून सुरु होईल आणि 6 एप्रिल 2025 रोजी संपेल.


अशी श्रद्धा आहे की यादरम्यान देवीची मनोभावे पूजा केल्यास आलेली सर्व संकट दूर होतात.


या चैत्र नवरात्रीमध्ये देवीला नऊ लवंग अर्पण केल्याने अनेक फायदे मिळू शकतात.


देवीला लवंग अर्पण केल्याने आसपासचे वातावरण शुद्ध होते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते.


जर तुम्हाला ग्रह दोष असेल तर देवीला लवंग अर्पण केल्याने त्याचा प्रभाव कमी होत जातो.


देवीला लवंग अर्पण केल्याने आरोग्य चांगले राहते.


अशी मान्यता आहे की जर आर्थिक स्थिती खराब असेल तर भक्तांनी चैत्र नवरात्रीच्या काळात देवीला लवंग अर्पण केल्याने तिची आर्थिक स्थिती चांगली होते.


(Disclaimer - ही एक सामान्य माहिती आहे कोणताही व्यक्तिगत सल्ला नाही. हा लेख केवळ माहितीसाठी दिला जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

VIEW ALL

Read Next Story