ऋतू कोणताही असो त्यात त्वचेची योग्य काळजी घेतली नाही तर त्वचेशी निगडित अनेक समस्या निर्माण होतात.
मधामुळे त्वचा गुळगुळीत, मुलायम आणि ग्लोइंग होते. तुम्ही ते फेस मास्क किंवा फेस पॅक सारखे देखील वापरू शकता. तेव्हा त्वचेवर मधाचा वापर कसा करावा तसेच त्वचेवर मध लावल्याने कोणते फायदे मिळतात याविषयी जाणून घेऊयात.
मधामध्ये अँटिऑक्सिडेंट आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म असतात. त्यामुळे मध चेहऱ्यावर लावल्याने अनेक समस्या दूर होतात. मध चेहऱ्यावर लावल्याने त्वचा मुलायम होते आणि मॉश्चराइज होते. तसेच त्वचा कोरडी होत नाही.
चेहरा पिंपल्सने भरलेला असेल तर तुम्ही चेहऱ्यावर दररोज मध वापरू शकता. केमिकलयुक्त पदार्थ वापरण्यापेक्षा चेहऱ्यावर मध लावल्याने त्वचा हेल्दी आणि ग्लोइंग होते.
मध चेहऱ्यावर लावल्याने त्वचेला फ्री रॅडिकल्सपासून वाचवण्यासाठी लाभदायक ठरू शकते. ज्यामुळे त्वचेवर दिसणारी वृद्धत्वाची लक्षण दूर होऊ शकतात.
मधाचा फेस पॅक नियमित लावल्याने त्वचेवरील डाग, फोड, पिंपल्स दूर होईल आणि त्वचेचा टोन देखील सुधारेल.
अनेकदा उन्हाळ्यात त्वचेवरील सनबर्नच्या समस्येमुळे त्वचेवर जळजळ आणि लाल पुरळ उठतात. तेव्हा ही समस्या टाळण्यासाठी तुम्ही त्वचेवर मध लावू शकता.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी किंवा त्वचेवर लावण्यापूर्वी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)