घरात वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांपैकी दालचीनी ही सर्वात उपयुक्त मानली जाते. खाद्यपदार्थांची चव वाढवण्यासाठी त्यात दालचीनी वापरली जाते.
उपाशीपोटी दालचीनीचे सेवन शरीराला लाभदायक ठरु शकते. तेव्हा, दालचीनी खाण्याचे फायदे?
महीनाभर सकाळी उपाशीपोटी दालचीनी खाल्याने रक्तदाबाला नियंत्रित ठेवता येते. ब्लड प्रेशरवर उपाय म्हणून रोज सकाळी उपाशीपोटी दालचीनी चावून खा.
दालचीनीमुळे चरबी तसेच वजन कमी करण्यास मदत होऊ शकते.
अॅसिडिटी आणि अपचनासारख्या समस्या असलेल्या लोकांना दालचीनीचे सेवन फायदेशीर ठरु शकते.
आतड्यांची सूज कमी करण्यासाठी रोज उपाशीपोटी दालचीनी चावून खाल्ली पाहिजे.
रोज दालचीनी खाल्याने इम्यूनिटी बूस्ट होण्यास मदत होते अणि हृदयाच्या स्वास्थ्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरु शकते.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)