लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वचजण पिस्ता अगदी आवडीने खातात आणि पिस्ता आरोग्यासाठी सुद्धा लाभदायक आहे.
लोक अनेकदा पिस्ता खाल्यानंतर त्याची सालं कचरा समजून फेकून देतात. मात्र पिस्त्याच्या सालींना कचरा समजण्याची चूक करु नका.
पिस्ता खाऊन झाल्यावर त्याची सालं तुमच्या बऱ्याच कामी येऊ शकतात. वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही पिस्त्याच्या सालींचा वापर करु शकता.
पिस्त्याच्या सालींचा वापर तुम्ही खाद्य बनवण्यासाठी करु शकता.
पिस्त्याच्या सालींमध्ये ऑईल कंटेंट मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. त्यामुळे याचा वापर तुम्ही बॉन फायर मध्ये करु शकता.
पिस्त्याच्या सालींचा वापर करुन तुम्ही ब्रेसलेट, हेअरपिन आणि नेकलेस सारख्या सौंदर्याची साधने बनवण्यासाठी वापरु शकतो.
वॉल आर्ट तसेच कँडल होल्डर बनवण्यासाठी पिस्त्याच्या सालींचा वापर केला जाऊ शकतो.
पिस्त्याच्या सालींच्या सहाय्याने वॉल हँगिंग आणि फोटो फ्रेम सुद्धा बनवू शकतो.