जाणून घ्या, गुलाबाच्या पानांचे आरोग्यासाठीचे फायदे

Jan 07,2025


आपल्या आसपासच्या परिसरात किंवा आपल्याच घरात आपण गुलाबाची झाडे पाहतो. परंतु, फार कमी लोक गुलाबाच्या पानांचे महत्त्व जाणतात.


गुलाबाची पाने आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गुणकारी मानले जातात.


गुलाबाचा लाकडाचा वेगवेगळ्या प्रकारे वापर केला जातो. गुलाबाचे लाकूड बाजारात मोठ्या किंमतीत विकले जाते.


गुलाबाच्या पानांमध्ये अ‍ॅंटीऑक्सीडेंट, अ‍ॅंटीबॅक्टेरियल आणि अ‍ॅंटीइंफ्लेमेटरीसारखे आरोग्यासाठी लाभदायक असलेले तत्व असतात.


गुलाबात असलेल्या अ‍ॅंटीबॅक्टेरियल आणि अ‍ॅंटीइंफ्लेमेटरीसारख्या गुणांमुळे त्वचेसंबंधी समस्यांना दूर ठेवण्यास मदत होते.


गुलाबाच्या पानांच्या पेस्टचा वापर केल्याने तोंडावरील मुरुम किंवा फोड्या कमी करता येतात.


जर तुम्ही दातांच्या वेदनेने ग्रासलेले असाल तर गुलाबांच्या पानांचे सेवन त्यासाठी फायदेशीर ठरु शकते.


गुलाबांच्या पानांची पेस्ट किंवा त्याचा काढा केसांना लावल्याने केसांमधील कोंडा कमी होण्यास मदत होते आणि यामुळे केस मजबुतसुद्धा होतात.


गुलाबाच्या पानांचा सरबत करुन प्यायल्याने पोटासंबंधी अ‍ॅसिडिटीसारख्या समस्या दूर होतात.


(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story