महिलांनी बनवल्या आहेत भारतातील या 5 ऐतिहासिक इमारती

Mar 07,2025


आपण नेहमी ऐकतो की मोठमोठ्या ऐतिहासिक इमारती, महाल राजा-महाराजांनी बनवले आहेत.


पण तुम्हाला माहित आहे का? भारतात असे अनेक मंदिर, वाडे आणि इमारती आहेत ज्या महिलांनी बनवून घेतल्या आहेत.


त्या काळाच्या महिलांनी या इमारती अगदी कोरीव आणि सुबक बनवल्या होत्या. या वास्तू आजही तितक्याच सुंदर दिसतात.

दक्षिणेश्वर काली मंदिर

राणी रासमणि कैवर्त ही मासेमारी करणाऱ्या समुदायातील पराक्रमी मुलगी होती. तिने दक्षिणेश्वर काली मंदीराची स्थापना केली.


हे मंदिर इतकं सुंदर आहे की आपल्याला वारंवार पाहण्याचा मोह आवरता येणार नाही.

राणी नी वाव (विहीर)

गुजरातमधील सरस्वती नदीच्या किनारी राणी उदयमतीने तिच्या नवऱ्याच्या स्मरणार्थ ही विहीर बनवली होती.


सात मजले असलेल्या या विहीरीत 500 हून जास्त मूर्ती बनवलेल्या आहेत.

मोहिनीश्वर शिवालय

एके काळी राजा हरि संग हे काश्मीरचे शासक होते. त्याच्या पत्नी महाराणी मोहिनीबाई सिसोदिया यांनी मोहिनीश्वर या मंदिराचे निर्माण केले.

विरुपाक्ष मंदिर

इ.स. 740 मध्ये राजा विक्रमादित्य द्वितीय यांनी पल्लव शासकां विरुद्ध युद्ध जिंकले. यानिमित्ताने राणी लोकमहादेवीने विरुपाक्ष मंदिराची स्थापना केली.

सिद्धिविनायक मंदिर, मुंबई

आपल्या महाराष्ट्रातदेखील हे एक 225 वर्षांपूर्वीच मंदिर आहे जे देऊबाई पाटील यांनी बनवून घेतलेलं आहे.

VIEW ALL

Read Next Story