आवळा आणि लसणाची चटणी ही चविष्ट असण्यासोबत आरोग्यासाठीसुद्धा फायदेशीर मानली जाते.
आवळा आणि लसणाची चटपटीत चटणी बनवण्याची अगदी सोपी रेसिपी जाणून घ्या.
यासाठी लागणारे साहित्य: आवळा, लसूण, काळी मिरी, हिंग, जिरे, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ.
सर्वप्रथम आवळ्यांना पाण्याने स्वच्छ धुवून घेऊन एका सुती कापडाने पुसून घ्या.
आता लसणाच्या 6 ते 7 पाकळ्या घ्या आणि आवळ्याच्या आतील बिया काढून ते व्यवस्थित कापून घ्या.
आता लसणाच्या पाकळ्या आणि आवळे मिक्सरमध्ये काळी मिरी, हिंग, जिरे आणि चिरलेल्या कोथिंबीरीसोबतत बारीक करुन घ्या.
आता मिक्सरमध्ये वाटून घेतलेल्या पेस्टला फोडणी देण्यासाठी एका कडईमध्ये 1 ते 2 चमचे तेल गरम करुन घ्या.
गरम केलेल्या तेलात सुकी लाल मिरची आणि जिरे घालून तयार केलेल्या पेस्टला फोडणी द्या.
आता तयार झालेली चटणी आपल्या गरमागरम जेवणात सर्व्ह करुन आस्वाद घ्या.