हनिमूनला पत्नीने अश्लील..., ब्रेकफास्ट अन्... घटस्फोटाची कारणं वाचून डोकं धरुन बसाल

Swapnil Ghangale
Oct 26,2023

घटस्फोटांच्या कारणांची चर्चा

घटस्फोट ही बाब हल्ली फार सामान्य झाली आहे. मात्र कोणत्या कारणांसाठी घस्फोट मागितला जातो ही गोष्ट सध्या चर्चेचा विषय ठरते.

व्हिडीओ चर्चेत

इन्स्टाग्रामवरील इन्फ्युएन्सर असलेल्या महिला वकील तान्या कौल यांनी पोस्ट केलेला असाच एका व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.

कारणांची यादीच

या व्हिडीओमध्ये तान्या कौल लोक घटस्फोटासाठी कोणकोणती कारणं देतात त्याबद्दलची माहिती देण्यात आली आहे.

लग्नच कशाला करता

तान्या कौल यांनी, 'मग लग्नच कशाला करता' अशा कॅप्शनसहीत शेअर केला आहे.

हिनमूननंतर लगेच मागितलेला घटस्फोट

हिनमूनला पत्नीे फार अश्लील कपडे परिधान केले होते म्हणून एका पतीने घटस्फोट मागितला होता.

युपीएससीमुळे संसारात मिठाचा खडा

नवरा युपीएससीची तयारी करत असून माझ्याकडे लक्ष देण्यासाठी त्याच्याकडे वेळ नाही म्हणून घटस्फोट हवाय असा अर्ज एका महिलेनं केलेला.

पाया न पडणारी बायको नको...

पत्नी पाया पडत नाही असं कारण सांगत नवऱ्याने घटस्फोट मागितला होता.

नाश्ता मिळत नाही म्हणून घटस्फोट

पत्नी सकाळी नाश्ता करत नाही आणि ऑफिसला उपाशीच जावं लागतं म्हणून एका नवऱ्याने घटस्फोट मागितला होता.

हे कारण तर फारच आश्चर्यकारक

एका प्रकरणात तर नवरा फार प्रेम करतो आणि लक्ष देतो म्हणून पत्नीने घटस्फोट मागितला होता.

विचित्र कारणांची यादीच

वाचूयात अगदी हनिमूनपासून ते युपीएससीपर्यंत तान्या यांनी सांगितलेली घटस्फोट मागण्यासंदर्भात अर्जदारांनी दिलेल्या विचित्र कारणांबद्दल...

VIEW ALL

Read Next Story