स्वीट डिशमध्ये शाही तुकडा ही रेसिपी खूपच लोकप्रिय झाली आहे. रबडी आणि ड्रायफ्रुड्स टाकून खूपच स्वादिष्ट लागते.
शाही तुकडा ब्रेडपासून बनवला जातो. मात्र, रात्री उरलेल्या शिळ्या चपात्यांपासूनही तुम्ही शाही तुकडा बनवू शकता.
१० मिनिटांत तुम्ही अगदी टेस्टी व चमचमीत शाही तुकडा बनवू शकता. पोळ्यांपासून बनवलेल्या शाही तुकडाची चवही अप्रतिम लागते
१ लीटर दूध, 100 ग्रॅम साखर, 50 ग्रॅम मावा, केसर, २ शिळ्या चपात्या, 1 टेबलस्पून केसर, 1 टेबलस्पून काजू, अवश्यकतेनुसार तूप
सगळ्यात पहिले एका पॅनमध्ये दूध आणि साखर टाकून दूध आटवून घ्या. त्यानंतर यात मावा, केसर आणि काजू-पिस्ता टाकून गॅस बंद करा.
त्यानंतर दुसऱ्या एका पॅनमध्ये थोडे तूप टाकून पोळ्या त्रिकोणी आकारात टाकून तुपात परतवून घ्या. त्यानंतर हे तुकडे उकळलेल्या दूधात टाकून लगेच काढून प्लेटमध्ये ठेवा
त्यानंतर त्यावर दूध टाकून केसर व काजू -बदाम टाकून अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवा. थंड झाल्यानंतर सगळ्यांना सर्व करा