अती साखरेच्या सेवनामुळं पाठीच्या कण्याच्या हाडांचं नुकसान होतं.
साखरेच्या सेवनामुळं स्पायनल डिस्क कमकुवत होते. शिवाय शरीराला सूजही येते, ज्यामुळं कंबरदुखी वाढते.
अधिक मिठाचं सेवनही हाडं दुखण्यास आणि प्रामुख्यानं कंबरदुखीस कारण ठरू शकतं. त्यामुळं अतिरिक्त मिठाचं सेवन टाळा.
मैद्यापासून तयार झालेल्या पदार्थांमुळं कणा, स्पायनल डिस्कवर नकारात्मक परिणाम होतात आणि यातून कंबरदुखी बळावते.
तेलकट पदार्थांच्या सेवनामुळं शरीरात चरबीचं प्रमाण वाढून पाठीच्या कण्यावर ताण येतो आणि वेदना वाढतात.
प्रोसेस्ट मीट आणि रेड मीटमध्ये सॅच्युरेटेज फॅटचं प्रमाण अधिक असल्यानं स्पायनल डिस्कला यामुळं धोका असतो. ज्यामुळं कंबरदुखी वाढते.