बासमती तांदळाच्या पिशव्या आणि कोल्हापुरी चप्पल नंतर, भारतातील आणखी एका गोष्ट जागतिक प्रेरणास्थान बनली आहे.
लुई व्हुताँच्या एका फॅशन शोमध्ये चक्क मिनी ऑटो रिक्षाच्या डिझाइनच्या हँडबॅग्ज होत्या.
तीन चाकी रचना, हँडलबार आणि पिवळ्या बॉक्सी कॅनोपीसह, ही बॅग त्यांच्या क्लासिक तपकिरी लेदर फॅब्रिकमध्ये दिसली.
या बॅगवर सिग्नेचर गोल्ड एलव्ही (LV) मोनोग्राम आहे.
पण, मनोरंजक गोष्ट म्हणजे, मध्यमवर्गीयांसाठी प्रवासाचे हे आवडते साधन 35 लाख रुपयांना विकले जात आहे.
एवढ्या किंमतीमध्ये एक छोटं घर येईल.
या डिझाईन आणि किंमतीमुळे इंटरनेटवर चर्चा निर्माण झाली आहे.