अस्सल महाराष्ट्रीय चवीचा झणझणीत मिरचीचा खर्डा; सोप्पी रेसिपी वाचा

Mansi kshirsagar
Apr 30,2025


हिरव्या मिरचीचा झणझणीत ठेचा म्हटलं की आपसूकच तोंडाला पाणी सुटते. आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्र स्पेशल मिरचीच्या खर्डाची रेसिपी सांगणार आहोत.


गरम भाकरी, पिठलं आणि मिरचीचा ठेचा म्हटलं की मन आणि पोटही तृप्त होते. हा मिरचीचा ठेचा कसा बनवायचा याची रेसिपी पाहूयात

साहित्य

एक वाटी मिरच्या, तेल, मीठ, शेंगदाण्याचा कूट, लसूण, एक कांदा बारीक चिरुन, जिरे आणि मोहरी


एका कढाईत तेल घेऊन त्यात मिरच्या परतून घ्या. मिरचीचा रंग बदलल्यानंतर त्यात लसणाच्या 20-25 पाकळ्या घाला


आता या मिश्रणात एक चमचा जिरे टाकून सर्व साहित्य परतून घ्या. आता हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवा


मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यात ठेचा वाटून घेऊ शकता. तसंच ठेचा वाटून घेण्याआधी त्यात मीठ घालायला विसरू नका

VIEW ALL

Read Next Story