कोकणात घावणे ही खूप लोकप्रिय डिश आहे. तांदळाचे पीठ वापरुन घावणे काढले जातात.
कोकणात चहासोबत घावणे खाल्ले जातात. अनेकदा सकाळचा नाश्ता हाच असतो.
परफेक्ट मालवणी घावणे बनवण्याची ही सोपी रेसिपी पाहा
तांदळाचे पीठ, मीठ आणि पाणी
सगळ्यात पहिले एका भांड्यात एक कप तांदळाचे पीठ घ्या. पीठात चवीनुसार मीठ आणी दीड कप पाणी टाका. पाण्याच्या प्रमाणावर घावणे ठरतात.
लोखंडी तवा गॅसवर ठेवून गरम झाल्यावर त्याला तेल लावा. त्यानंतर घावणाचे मिश्रण व्यवस्थीत ढवळून घ्या.
आता एका छोट्या वाटीने मिश्रण तव्यावर ओता. गोल आकार झाल्यावर त्यावर झाकण ठेवा.
10 ते 15 सेकंद वाफ काढून झाल्यावर गॅस मध्यम आचेवर ठेवून घावण पलटी करुन दोन्ही बाजूने शिजवून घ्या.
मऊ-लुसलुशीत जाळीदार घावणे तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकतात.