अनेक लोक चहा बनवल्यानंतर उरलेली चहा पावडर फेकून देतात.
मात्र, फेकून न देता त्या पावडरपासून आपण घरगुती स्क्रब बनवू शकतो.
चहा पावडरमध्ये अँटीऑक्सिडंट्स, टॅनिन आणि कॅफिन असतात, ज्यामुळे ती शरीरावरील डेड स्किन सेल्स काढून त्वचेला खोलवर साफ करतात.
हे स्क्रब टॅनिंग दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे.
एका भांड्यात कोरडी किंवा ओली चहा पावडर घ्या आणि त्यात दही, मध, लिंबाचा रस आणि तांदळाचे पीठ घाला. त्यानंतर सर्व एकजीव करा.
तयार झालेले स्क्रब चेहऱ्यावर, हातावर आणि मानेवर लावून 5 ते 7 मिनिटे मसाज करा.
नंतर 10 ते 15 मिनिटांनी कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. स्क्रबिंग केल्यानंतर त्वचेला मॉइश्चरायझर लावणे विसरू नका.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भावरून घेतली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)