उन्हाळा सुरू होताच लोकांच्या खाण्या-पिण्यात आणि कपड्यांमध्येही मोठा बदल दिसून येतो.
उन्हाळ्यात अनेकांना थंड पेयांची आवड असते. पन्हं, सॉफ्ट ड्रिंक्स आणि विशेष म्हणजे ताक.
ताक अनेकांना आवडते, मात्र ते घरच्या घरी कसे चविष्ट बनवावे हे अनेकांना माहीत नसते.
जाणून घेऊयात बाजारात मिळणाऱ्या ताकापेक्षा अधिक चविष्ट ताक घरीच कसे तयार करायचे.
1 वाटी दही, 1 वाटी थंड पाणी , चवीनुसार काळं मीठ, अर्धा चमचा जिरे पूड आणि हवी असल्यास पुदिन्याची ताजी पाने
मिक्सरमध्ये दही आणि तेवढंच थंड पाणी घालून चांगलं मिक्स करून घ्यावे.
तयार झालेले ताक एका पातेल्यात घेऊन त्यात चवीनुसार काळं मीठ घाला.
आता त्यात भाजलेली जीरे पूड घालून पुन्हा एकदा नीट ढवळून घ्या.
जर तुम्हाला पुदिन्याची चव हवी असेल, तर दही आणि पाणी मिक्सरमध्ये बारिक करताना त्यात थोडीशी पुदिन्याची पाने देखील घालू शकता.
हे ताक उन्हाळ्यात आरोग्यदायी तर आहेच, पण अतिशय चविष्टही आहे. एकदा हे ताक अशा पद्धतीने घरी बनवा आणि त्याची चव अनुभवून बघा.