घरच्या घरी सकाळच्या नाश्त्यासाठी करा कुरकुरीत मूग डाळीची भजी

Intern
Apr 01,2025


सकाळच्या नाश्त्यासाठी काय करावे हे सूचत नसेल तर, मूग डाळीची भजी हा एक उत्तम पर्याय आहे.


मूग डाळीपासून तयार केलेली भजी न केवळ चविष्ट असतात, तर आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतात.


मूग डाळ हाडांच्या मजबुतीसाठी, त्वचेसाठी आणि रोगप्रतिकारक शक्तीला बळकट करण्यासाठी खूप उपयुक्त आहे.

मूग डाळीची भजी कशी बनवावी?

मूग डाळ 4-5 तास पाण्यात भिजवून ठेवा. भिजल्यानंतर, मिक्सरमध्ये डाळ बारीक करुन घ्या.


बारीक केलेल्या मूग डाळीत हिरवी मिरची, आलं, कोथिंबीर, हिंग आणि मीठ घालून चांगले एकजीव करा.


आता हे मिश्रण एका स्वच्छ कपड्यात बांधून थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा.


काही वेळाने या मिश्रणाचे छोटे गोळे तयार करा आणि गरम तेलात मध्यम आचेवर तळून घ्या.


तुम्ही मूग डाळीची भजी पुदिन्याच्या चटणीसोबत किंवा इतर चटणीसोबत खाऊ शकता.

VIEW ALL

Read Next Story