घरच्या घरी बनवा अगदी सोप्या पद्धतीने कुरकुरीत स्प्रिंग रोल!

Intern
May 08,2025


कुरकुरीत स्प्रिंग रोल लहान मुलांसोबतच मोठ्यांनाही खूप आवडतात. मात्र सतत बाहेरचं खाणं आरोग्यासाठी धोकादायक असू शकतं. म्हणूनच जाणून घेऊयात घरच्या घरीच चविष्ट आणि कुरकुरीत स्प्रिंग रोल कसे तयार करायचे.

साहित्य:

मैदा, बेकिंग पावडर, मीठ, तेल , बारीक चिरलेला कोबी, बारीक चिरलेले गाजर, लसून आणि आल्याचे बारीक तुकडे, कांदा, सोया सॉस, काळी मिरी पावडर.

कृती:

एका भांड्यात मैदा, बेकिंग पावडर, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा तेल घालून मऊसर पीठ मळा. हे पीठ अर्धा तास झाकून ठेवा.


एका पॅनमध्ये थोडं तेल गरम करून त्यात आलं, लसूण आणि कांदा परता. नंतर त्यात गाजर आणि कोबी घालून थोडं परता. आता त्यात सोया सॉस, काळी मिरी पावडर आणि मीठ घालून सर्व एकत्र करावे.


मळलेल्या पिठाच्या लहान लहान पोळ्या लाटा. त्या थोड्याशा भाजून घ्या. मग त्या पोळ्या चौकोनी आकारात कापून त्यामध्ये तयार केलेलं स्टफिंग भरा. आता त्याचे आयताकृती रोल बनवा.


गरम तेलात हे रोल दोन्ही बाजूंनी खरपूस आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा. तळलेले स्प्रिंग रोल सॉस, मेयोनीज किंवा चटणीसोबत सर्व्ह करा.

टिप:

स्प्रिंग रोल अधिक हेल्दी बनवण्यासाठी राईस पेपरचा वापर करुन रोल स्टीमही करता येतात. तळण्याऐवजी एअर फ्रायरमध्येही हे रोल कुरकुरीत करता येतात.

VIEW ALL

Read Next Story