स्पेशल डिनरसाठी बनवा चविष्ट स्वीट कॉर्न करी; साधं जेवणही होईल खास!

Intern
May 24,2025


तुमच्याकडे रात्री पाहुणे येणार असतील आणि तुम्ही विचारात असाल की जेवणात काय खास करावं, तर ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे.


आज आपण पाहणार आहोत की साध्या रात्रीच्या जेवणालाही खास डिनरमध्ये कसं रूपांतर करता येईल.


तर जाणून घेऊयात स्वीट कॉर्न करीची एक सोपी आणि चविष्ट रेसिपी.

साहित्य:

स्वीट कॉर्न, टोमॅटो, हिरवी मिरची, आलं, कसूरी मेथी, काजू, क्रीम, हळद, लाल तिखट, धणे पावडर, गरम मसाला, तेल, मीठ आणि कोथिंबीर.

कृती:

सर्वप्रथम काजू 10 मिनिटे पाण्यात भिजवून त्याची पेस्ट तयार करावी. त्यासोबत टोमॅटोचीही पेस्ट तयार करून ठेवावी.


एका कढईत तेल गरम करून त्यात बारीक चिरलेलं आलं आणि हिरवी मिरची परतून घ्यावे. त्यानंतर टोमॅटो आणि काजूची पेस्ट घाला.


मग त्यात हळद, लाल तिखट, धणे पावडर आणि मीठ घालून चांगले एकजीव करावे.


करी शिजल्यानंतर त्यात क्रीम, गरम मसाला आणि कसूरी मेथी घालून अजून 2-3 मिनिटं शिजवा.


करी शिजल्यानंतर त्यात क्रीम, गरम मसाला आणि कसूरी मेथी घालून अजून 2-3 मिनिटं शिजवा.


वरून कोथिंबीर घालून ही गरमागरम स्वीट कॉर्न करी सर्व्ह करा.


ही करी पराठा, पोळी, नान किंवा जिरा राईससोबत खाऊ शकतात.

VIEW ALL

Read Next Story