शेवग्याच्या शेंगा आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात.
कधी कधी मुलं शेंगा खायला कंटाळा करतात. अशावेळी त्यांना बनवून द्या हा पदार्थ
शेवग्याच्या शेंगा, बेसन, तिखट, मीठ, ओवा, हळद, हिंग
सगळ्यात पहिले शेंगा कापून थोडी सालं काढून घ्या. नंतर एका भांड्यात पाणी घेऊन त्यात थोडे मीठ टाकून या भांड्यात शेंगा उकडवून घ्या
त्यानंतर एका भांड्यात बेसन घेऊन त्यात तिखट, मीठ, ओवा, हळद आणि हिंग घालून आवश्यकतेनुसार पाणी घाला.
आता उकडलेल्या शेंगा भजीसाठी केलेल्या पीठात टाकून कमी तेलात शॅलोफ्राय करुन घ्या.