रोजच्या धकाधकीच्या जीवनात व बदलत्या जीवनशैलीमुळं पौष्टिक आहार खाणे होतच नाही
अशावेळी तुम्ही पौष्टिक पदार्थ पण हटके पद्धतीने करुन पाहू शकता.
आज आम्ही तुम्हाला बीटाचे पौष्टिक लाडू कसे करायचे हे जाणून घेऊया.
एक मोठं बीट, दीड वाटी डेसीकेटेड कोकोनट, तीन वाट्या दूध, एक मोठा चमचा तूप, एक वाटी साखर, वेलची पावडर,
सर्वप्रथम बीट सोलून किसणीवर किसून घ्या. त्यानंतर एका कढाईत तुप टाकून ते पूर्णपणे वितळू द्या.
आता त्या तुपावर बीटाचा किस चांगला परतून घ्या आणि झाकण ठेवून एक छान वाफ काढा.
एक वाफ आल्यानंतर त्यात दूध, साखर, डेसीकेटेड कोकोनेट घाला आणि मिश्रण चांगले एकजीव करुन घ्या
मिश्रणाचा घट्ट गोळा होईपर्यंत शिजवा. मध्ये मध्ये सतत हे मिश्रण हलवत राहा. नंतर त्यात वेलची पावडर घालून गॅस बंद करा.
आता हे मिश्रण गार झाल्यानंतर लाडू वळायला घ्या.