हिंदू धर्मात मंगळागौरीच्या व्रताला विशेष महत्व प्राप्त आहे. विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी व्रत करतात. (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
मंगळागौरीला सर्व महिला एकत्र जमून मंगळागौरीचे पारंपरिक खेळ खेळतात. यावेळी सौभाग्यवती स्त्रिया उखाण्यांमधून पतीचं नाव घेतात. (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
आकाशात कडकडल्या विजा ____रावांचे नाव घेऊन सोबत करते मंगळागौरीची पूजा (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र-सूर्य झाले माळी ____चे नाव घेते, मंगळागौरीच्या वेळी (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
लग्नानंतर बदलून चालत नाही नुसतं नाव, बदलावा लागतो स्वभाव ____च्या घरी मिळेल माझ्या कलागुणांना वाव, मात्र मंगळागौरीच्या दिवशी खाते थोडा भाव (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
मंगळागौरीच्या खेळामुळेच मिळाली आहे गोड आठवण ____रावांचे नाव घेते सासरच्यांकडून लाभली प्रेमाची गोड साठवण (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
मंगळागौरीच्या दिवशी सर्वांना नमस्कारासाठी जोडते हात, ____ रावांचे नाव घेते आता तरी सोडा माझी वाट (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
सीतेची पवित्रता, पार्वतीचा निग्रह, मंगळागौरीच्या दिवशी ____रावांचे नाव घेण्यासाठी केला सर्वांनी आग्रह (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
लग्नानंतर पहिली मंगळागौर साजरी करते माहेरी, ____ रावांचे नाव घेते नेसून साडी चंदेरी (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
सोळा दिव्यांनी केली मंगळागौरीची आरती ____ राव आहेत माझ्या संसाररथाचे सारथी (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)