आता मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे.
उद्या या महिन्यातील पहिला गुरूवार व्रत आहे.
यादिवशी उपवासासाठी तुम्ही चमचमीत आणि हेल्दी 'डोसा' बनवू शकता.
साबुदाणा किंवा भगर एका भांड्यात घेऊन त्यात पाणी घालून भिजवून घ्या.
भिजलेल्या साबुदाणा किंवा भगरमध्ये शेंगदाणा कूट, जिरे पूड आणि चवीनुसार मीठ घालून चांगले मिश्रण तयार करा.
मिक्सरच्या मदतीने मिश्रण बारीक करून डोशाचे पीठ तयार करा.
गरम तव्यावर तेल लावून डोशाचे मिश्रण पसरवा.
दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत डोसा भाजून घ्या.
उपवासाच्या चटणीसोबत गरमागरम डोसा सर्व्ह करा.