अनेकांना बाहेरचं खाल्ल्यामुळे ऍसिडिटी, गॅस, सारख्या समस्या होतात.
तेलकट, तिखट खाल्ल्याने अनेकांना ऍसिडिटीचा त्रास होऊ लागतो.
तेव्हा वारंवार होणाऱ्या ऍसिडिटीच्या त्रासापासून वाचण्यासाठी कणिक मळताना त्यात 3 गोष्टी मिसळायला हव्यात.
चपातीसाठी पीठ मळताना एक चमचा मेथी पावडर टाकावी. यामुळे ऍसिडिटी, गॅसची समस्या कमी होण्यास मदत होईल.
चपातीच्या पिठामध्ये तुम्ही एक चमचा ओव्याची पूड सुद्धा टाकू शकता.
गॅस, ऍसिडिटीच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही चपातीचं पीठ मळताना त्यात एक चमचा जिऱ्याची पावडर सुद्धा टाकू शकता.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)