मुलांच्या डब्यासाठी बनवा झटपट होणारे पौष्टिक थालीपीठ

मुलांना डब्याला काय द्यायचं असा प्रश्न पडतो.


अशावेळी झटपट तयार होणारे व पौष्टिक असे थालीपीठ बनवा


मूग डाळीचे थालीपीठ पौष्टिक आणि चविष्ट आहे.

साहित्य

मोड आलेली मूग,मिरची,लसूण,कांदे,कोथिंबीर,धनेपूड,जिरेपूड,ओवा,हळद, मीठ,गव्हाचे पीठ,तांदळाचे पीठ,ज्वारीचे पीठ,बेसन,तूप किंवा लोणी,तेल

कृती

मोड आलेल्या मुगात लसूण आणि मिरची टाकून मिक्सरमध्ये बारीक करुन घ्या


त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, धनेपूड,जिरेपूड,ओवा,हळद, मीठ घाला


आता त्यात सर्व गव्हाचे पीठ,तांदळाचे पीठ,ज्वारीचे पीठ टाकून नीट मळून घ्या.


आता पोलपाटावर किंवा सुती कपड्यावर थापून तव्यावर टाका.


तूप लावून थालीपीठ चांगले भरपूस भाजून घ्या

VIEW ALL

Read Next Story