पहिल्या नंबरवर महागड्या चहांमध्ये दा-होंग-पाओ-टी (Da-Hong Pao Tea) येते. ही चहा चीनच्या फुजियान प्रांताच्या वूई या डोंगराळ भागात उगवली जाते. ही चहा प्रतिकिलो 9 कोटी रुपयांना मिळते.
पांडा डंग टी (Panda Dung Tea) ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची महागडी चहा आहे. याची किंमत साधारण 57 लाख रुपये आहे.
सिंगापुरच्या यलो गोल्ड बड्स टी (Yellow Gold Buds Tea) च्या पानांवर 24 कॅरेट गोल्ड फेल्क्स शिंपडला जातो. याची किंमत साधारण 6 लाख रुपये आहे.
चौथ्या क्रमांकावर तैगुआनइन टी (Tieguanyin Tea) असून याच नाव बौद्ध गुरु तैगुआनइन यांच्यावरून ठेवण्यात आलंय. याची किंमत 2.3 लाख रुपये प्रति किलो आहे. ही चहा ब्लॅक टी आणि ग्रीन टी इत्यादींच्या मिश्रणातून बनते.
ब्रिटिश कंपनी पीजी टिप्स यांचं डायमंड टी बॅग (PG Tips Diamond Tea Bag) ही पाचव्या क्रमांकाची सर्वात महागडी चहा आहे.
या चहाच्या पिशवीत 280 हिरे जडवलेले आहेत आणि ते बनवण्यासाठी 3 महिने लागतात. त्याची किंमत प्रति किलो 9 लाख रुपये आहे.